भाटशिरगांवचे श्री मारुती मंदिर

भाटशिरगांव येथे गावाच्या मध्यभागी जुन्या ग्रामपंचायत इमारतीच्या शेजारी एक दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्येच गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला स्वतंत्र तालीम आहे. या मारुती मंदिराचे बांधकाम ब्रिटिशकालीन असून, आता जीर्णावस्थेत असलेले मंदिर व तालमीचा जिर्णोद्धार व पुनर्बांधणीसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत श्री मारुती मंदिर जिर्णोद्धार समितीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे.