कर भरणा
कृपया गावातील तसेच गावच्या हद्दीतील सर्व वाडी- वस्त्यांवरील सर्व नागरिकांनी आपल्या घराची विहित घरपट्टी, पाणीपट्टी, पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन असेल तर डिपॉझिट तसेच सर्व थकबाकीची रक्कम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी जमा करून सहकार्य करावे.
तसेच सर्व नागरिकांनी प्रतिमाणशी ₹ २००/- एवढी लोकवर्गणी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी ग्रामपंचायतीकडे जमा करावी. भाटशिरगांवसह वाडी- वस्त्यांवरील सर्व नागरिकांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी जमा केल्यास मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आपल्या भाटशिरगांवला १० गुण मिळतील. तसेच गावामध्ये तसेच वाडी- वस्त्यांवर शक्य ती विकासकामे करण्यासाठी हक्काचा निधी उपलब्ध होणार आहे.
आता घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी घरबसल्या भरु शकता. आपल्या भाटशिरगांव ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आधुनिक QR Code ची सुविधा उपलब्ध: आपल्या भाटशिरगांव ग्रामपंचायतीचे लिपिक श्री. नामदेव आलुगडे यांना 9850377193 या मोबाईल नंबरवर संपर्क करुन घरपट्टीची एकूण रक्कम, पाणीपट्टीची एकूण रक्कम व प्रतिकुटूंब एकूण लोकवर्गणी विचारुन खालील QR Code द्वारे घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी स्वतंत्रपणे भरता येईल. जेणेकरून ग्रामपंचायतीचे कर्मचारी व नागरिकांचा वेळ वाचेल व करांचा भरणा लवकर करता येईल. ग्रामपंचायतीचे कर्मचारी रितसर तिन्ही पावत्या नागरिकांना घरपोहोच देतील.

कृपया घरपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा

कृपया पाणीपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा












